Farming Business Idea : आजच्या आर्थिक युगात शेती क्षेत्रात (Farming Sector) मोठा बदल बघायला मिळत आहे. आता शेतकरी बांधव (Farmers) देखील उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने पीक पद्धतीत मोठा बदल करीत आहेत. आता शेतकरी बांधवांना देखील अधिकचे उत्पन्न कमवायचे आहेयामुळे आता शेतकरी बांधव पीक पद्धतीत बदल करून नगदी (Cash Crop) तसेच हंगामी पिकांची लागवड करीत आपले नशीब आजमावत आहेत आणि शेतीतून चांगले उत्पन्न देखील मिळवत आहेत. शेतकरी मित्रांनो जर तुम्हालाही शेतीतून चांगला नफा मिळवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला टरबूज शेतीबद्दल (Watermelon Farming) अवगत करणार आहोत

यामुळे निश्चितचं टरबूज शेतीतुन (Watermelon Crop) तुम्हाला दर्जेदार उत्पादन प्राप्त करता येणे शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल यात तिळमात्र देखील शंका नाही. झारखंडमधील काही महिला शेतकरी देखील टरबूज शेतीतून आपले भविष्य उज्वल करीत आहेत. झारखंडच्या हजारीबागमध्ये वास्तव्यास असलेल्या काही महिला शेतकरी टरबूजाच्या शेतीतून मोठी कमाई करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हजारीबागच्या चर्हीमध्ये राहणाऱ्या 700 महिला शेतकऱ्यांनी 200 एकर जमिनीवर टरबूजांची लागवड करून लाखोंचा नफा कमावला आहे. या सर्व महिलांनी गट शेतीचे महत्त्व ओळखले आणि आपल्याजवळील शेतजमीन एकत्र करून सुमारे सातशे महिलांनी दोनशे एकर शेतीत सामूहिक शेती सुरू केली. सर्व महिलांनी एक गट तयार करून शेतीसाठी मोठी जमीन तयार करून शेती सुरू केली. त्यामुळे साहजिक अधिक उत्पादन त्यांना मिळाले आणि त्यांचे उत्पन्न वाढले

टरबूज शेतीसाठी हवामान कस असावं बरं

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, टरबूजच्या शेतीसाठी उबदार आणि सरासरी आर्द्रता असलेले हवामानाचा प्रदेश अतिशय उपयुक्त असतो. अशा प्रदेशात टरबूजची शेती सुरू केल्यास निश्चितच शेतकऱ्यांना यातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळू शकते. कृषी तज्ञांच्या मते, 25-30 अंश सेल्सिअस तापमान टरबूज पिकांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते अशा हवामानात टरबुज पिकाची वाढ चांगली होते परिणामी उत्पादनात वाढ होते.

टरबूजचे पीक वालुकामय चिकणमाती असलेल्या जमिनीत चांगले येते. मात्र असे असले तरी याची शेती ही नदीकिनारी करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देत असतात. नदीकिनारी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच त्याची शेती फायद्याची ठरते. याशिवाय टरबूज पिकाची शेती ज्या शेतजमिनीच्या मातीचा pH 6.5 ते 7.0 पेक्षा जास्त असतो अशा ठिकाणी करू नये असे सांगितले जाते.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, आपल्या भारतात मैदानी भागात विशेषता उत्तर भारतातील मैदानी भागात टरबूजची शेती फेब्रुवारी महिन्यात केली जाते. तर दुसरीकडे नद्यांच्या किनारी भागात या पिकांची मार्चपर्यंत लागवड केली जाते असा कृषी वैज्ञानिक देखील सल्ला देत असतात.

याशिवाय डोंगराळ भागात मार्च ते एप्रिलपर्यंत टरबूज पिकाची शेती केली जाते. शेतकरी मित्रांनो जर आपणास देखील टरबुजाची शेती करायची असेल तर याच्या लागवडीचा कालावधी हा योग्य असला पाहिजे आपण यासाठी कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा किंवा कृषी वैज्ञानिकांचा एकदा अवश्य सल्ला घ्यावा.

टरबुज पिकाची हार्वेस्टिंग नेमकी कधी असते

याबाबत कृषी वैज्ञानिक सांगतात की, टरबुज पिकाची लागवड केल्यापासून सुमारे 3 महिन्यांनी टरबूजची हार्वेस्टिंग सुरु होते. साधारणता टरबूज ही फळे अडीच महिन्यानंतर काढणी योग्य बनतात. टरबूजच्या फळांचा आकार आणि रंग हा त्याच्या जातीवर अवलंबून असतो.

यामुळे टरबूजच्या प्रगत वाणांची लागवड करण्याचा कृषी वैज्ञानिक सल्ला देतात. टरबूज चे फळ काढणी योग्य बनले आहे की नाही हे तपासण्यासाठी फळावर चीर मारून दाब द्यावा, या पद्धतीने आपण टरबूजचे फळे पिकले आहेत की नाही हे तपासू शकतात. मात्र टरबूजची फळे जर अंतरावर बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवायची असतील तर फळे पूर्ण पिकण्याअगोदर काढून घ्यावीत. फळ नेहमी देठापासून वेगळे करण्यासाठी धारदार चाकू वापरावे. याशिवाय फळे खुडून थंड ठिकाणी गोळा करावीत असा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात.

टरबूज पासून कमाई

कृषी वैज्ञानिक सांगतात की, एक हेक्टर शेतात टरबूजाच्या सुधारित जातींपासून सरासरी 200 क्विंटल ते 600 क्विंटलपर्यंत उत्पादन घेता येऊ शकते. टरबूजचे उत्पादन हे सर्वस्वी त्याच्या जातीवर आणि हवामानावर अवलंबून असते. टरबूज पिकाला बाजारभाव 8 ते 10 रुपये किलो असतो मात्र यामध्ये देखील चढ-उतार हा बघायला मिळतो. सध्या टरबूजची आवक वाढल्याने मात्र बाजारभाव खूपच कमी झाला आहे. मात्र, उन्हाळ्यात टरबूजची मागणी असते त्यामुळे शेतकऱ्यांना या टरबूजच्या पिकातून 2 ते 3 लाख रुपये सहज मिळू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *