Pm Kisan
Pm Kisan

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योनामार्फत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांना चार महिन्यामध्ये किसान राशी म्हणून तीन हफ्त्यात २-२ हजार रु दिली जातात. ते त्यांच्या शासनामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होतात. ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेती आहे आणि तसेच राष्ट्रीय बँकेत खाते आहे अश्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर Pm Kisan yojna पैसे टाकते.

आत्तापर्यंत शेतकऱ्यांना १४ हफ्ते त्यांच्या बँक खात्यावर पडले आहेत. माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ वां हफ्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये पाठवला जाऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांना भूलेख अंक, तसेच आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे शेतकऱ्याने तपासावे, आपल्या बँक खात्याची ई-केवाईसी आणि रजिस्ट्रेशन करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार डब्बल हफ्प्ता ….
जर तुमच्या बँक खात्यावर आत्तापर्यंत पीएम किसान योजना चा १४ व हफ्ता आला नसेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला ई – केवाईसी करावी लागेल. तरच तुमच्या बँक खात्यावर दोन्ही हफ्ते पडू शकतात. जसे कि १४ आणि १५ हे दोन्ही हफ्ते सोबतच पडतील. त्याचबरोबर तुम्ही पीएम – किसान योजना लिस्ट मध्ये तुमचे नाव आहे का हे तपासून घ्या. या योजनेद्वारे सरकार गरीब लोकांना आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे काम करत आहे. ज्यांच्याजवळ कमीतकमी २ एकर पर्यंत शेतीयोग्य जमीन असायला हवी. ही योजना केंद्र सरकार चालवते या योजनेद्वारे आपल्या राज्याची मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी हाच उदेश सरकारचा आहे

पीएम किसान योजनेचे नियम :

  • पीएम किसान योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती घेऊ शकतो.
  • कुटुंबातील दुसऱ्या सदस्याने या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर सख्त कारवाई केली जाईल.
  • त्याचबरोबर त्या व्यक्तीला पीएम किसान योजना मार्फत भेटलेली राशी सुद्धा परत करावी लागेल.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ,कसा करावा अर्ज?

सर्वप्रथम, अर्जदाराने योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर तुमच्या संगणकाच्या मुख्यपृष्ठावर अधिकृत वेबसाईट ओपन करा.
त्या मुख्यपृष्ठावर तुम्हाला “[शेतकरी कॉर्नर]” हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा, त्याच पर्यावर तुम्हाला आणखी ३ पर्याय दिसतील.
त्यामध्ये तुम्हाला “[नवीन शेतकरी नोंदणी]” पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म उघडेल.
त्या फॉर्ममध्ये विचारलेली पूर्ण माहिती भरावी जसे कि, आपला आधार नंबर, प्रतिमा कोड आणि अजून विचारलेली माहिती.
सर्व योग्य माहिती भरल्यानंतर सबमिट करावे.
नंतर नोंदणी फॉर्मची प्रिंट आउट काढून घेणे आणि भविष्यासाठी जतन करा.
अशा प्रकारे आपला अर्ज पूर्ण होईल.

पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक साह्य व्हाव्हे मनून सरकारने या योजनेची सुरवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दारिद्र्य तर दूर नाही होणार परंतु त्यांना शेती साठी प्रोत्साहन मिळेल आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *