महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात संत्रा उत्पादनासाठी नागपुरी संत्र्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.त्याच बरोबर वातावरणीय बदलामुळे आलेला बार झडत असल्याने मिळणारे उत्पादन घटत आहे या दोन्ही संकटे एकाच वेळेस आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच प्रसंग उदभवला आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त संत्र्यांची निर्यात बांगलादेशला भारत करत असतो पण केंद्र सरकारच्या धोरणांमुळे बंगलादेश ने २०१९ पासून आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक वर्षी शुल्क वाढवत असल्याने २०२३ ला संत्रावरील दर प्रति किलो प्रमाणे ८८ रुपया पर्यंत पोहोचला आहे नागपुरातील कळमना मार्केट मध्ये संत्र्याला फक्त २० ते २५ हजार रुपये प्रति टन दर मिळत असल्याने या मधून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.बांगलादेशाने शुल्क कमी लावले असते तर हेच दर ४० हजार रुपये प्रतिटन प्रमाणे उत्पादकांना मिळाले असते.

नागपुरी संत्र्याचे महत्व :-
लिंबू वर्गीय फळांमध्ये संत्राला अधिक महत्व आहे. संत्रा हे ‘क’ जीवनसतवा मोठे स्रोत असल्याने शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणारे फळ आहे.संत्रामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने कॅन्सर सारख्या आजारांवर सुद्धा गुणकारी समजल्या जाते.वातावरणीय बदलामुळे सर्दी,खोकला या आजारांवर प्रभाव पाळण्यासाठी व रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी सुद्धा प्रभावकारी ठरत असतो.

नागपुरी संत्र्याचा इतिहास :-

नागपुरी संत्र्याला दोनशे वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी नेपाळ व पूर्वेत्तर राज्यातून संत्र्यांचा काही कलमा आपल्या सोबत आणून बागेमध्ये लावले असता नागपूरच्या वातावरणामध्ये त्या वाढू लागल्या व संत्र्याला गोळ चव असल्याने त्यांनी शेतकऱ्यांना उत्पादन घेण्याचा सल्ला दिला . नागपुरी संत्र्याला जगात वेगळी ओळख मिळून दिल्याने GI टॅग सुद्धा मिळालेला आहे.

संत्र्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प कागदावरच :

नागुरातील काटोल,नरखेड,वरुड,मोर्शी, कळमेश्वर व मध्यप्रदेश येथील छिंदवाडा जिल्ह्यातून मोट्या प्रमाणामध्ये संत्रांची आवक मार्केट मध्ये होत असते.
मार्केट मधुन संपूर्ण भारतात व भारताबाहेर संत्रा वाहनांच्या सहाय्याने जगभरात पोहोचत असते.जर नागपूर मध्येच प्रक्रिया करणे प्रकल्प झाल्यास शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने पतंजली कंपनीला मिहान येथील जमीन स्वस्तामध्ये उपलब्ध करून दिली पण अजून पर्यंत कंपनी चालू झाली नसल्याने शेतकरी कमी भावात व्यापाऱ्यांना माल विकत आहे. राज्य शासनाने काटोल सावनेर MIDC मध्ये प्रकल्प आणण्याची घोषणा केली पण दोन्ही प्रकल्प बंद फाईल मध्ये अडकलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *