Government Scheme : शेतकऱ्यांना गरजेनुसार छोट्यामोठ्या आकाराचे वैयक्तिक शेततळे खोदण्यासाठी राज्यात सरकारी पातळीवर अनेक योजना आहेत. शेततळ्याला अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन संकेतस्थळ उपलब्ध आहे. मात्र तेथे अर्ज भरण्यापासून विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.

Farm Pond Subsidy : शेततळ्याचे अनुदान वाटप पारदर्शक होण्यासाठी काढली जाणारी संगणकीय सोडत (लॉटरी) पद्धत उत्तम आहे. सोडतीत नाव निघाले की शेतकऱ्याला त्याच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) निवड झाल्याचे कळविले जाते.

मात्र अर्ज करूनही सोडतीत नाव आले नसल्यास अशा शेतकऱ्याला प्रतीक्षायादीवर ठेवले जाते. ही यादी पुढील वर्षीच्या सोडतीकरिता वापरली जाते. त्यामुळे एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसते.

यंदाच्या वर्षात १५ हजार शेततळ्यांना अनुदान

राज्यात यंदाच्या वर्षात १५ हजार नव्या शेततळ्यांना अनुदान देण्याची तयारी कृषी खात्याने केली आहे. अनुदानासाठी आठ वेगवेगळ्या आकारमानाची शेततळी ठरविण्यात आली आहेत. नेमके कोणत्या आकाराचे तळे निवडावे याविषयी आधी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होत असे.

मात्र आता तळ्याची निवड करण्यासाठी कृषी कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक तळ्याला आकारमानानुसार किमान १८ हजारांपासून ते कमाल ७५ हजारांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. आधी ऑनलाइन अर्ज भरतानाही क्लिष्टपणा होता. त्यामुळे गोंधळ उडत असे. ही अर्जप्रक्रिया सुटसुटीत करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

त्यासाठी कृषी आयुक्तालयाच्या मृद्‍संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाचे संचालक रवींद्र भोसले, सहसंचालक पांडुरंग शेळके, कृषी उपसंचालक प्रवीण कांबळे, कृषी अधिकारी संगीता बोकाडे, कृषी पर्यवेक्षक पुरुषोत्तम कुगावकर या अधिकाऱ्यांचा गट परिश्रम घेतो आहे. त्यामुळे लवकरच ऑनलाइन व्यवस्था आणखी सोपी होणार आहे.

इनलेट, आउटलेटसह शेततळे म्हणजे नेमके काय?

१) शेततळ्याच्या जवळील नदी, नाले, ओहोळ यातून वाहणारे पावसाचे पाणी शेततळ्याच्या आत घेऊन (इनलेट) जादा झालेले पाणी बाहेर सोडण्याची (आउटलेट) सुविधा असलेल्या शेततळ्याला इनलेट, आउटलेटसह शेततळे असे म्हणतात.

२) दुसरे शेततळे साध्या प्रकारचे असते. त्याला इनलेट व आउटलेट नसते. त्यात पावसाच्या पाण्याऐवजी विहीर किंवा कूपनलिका अशा

स्रोतातून उपसून पाणी आणले जाते. अशा तळ्यांना इनलेट-आउटलेट विरहित शेततळे असे म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *