अनेक शहरांना उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, बर्फवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसत आहे. तो आता आधुनिक अर्थव्यवस्थेचे प्रतीक असलेल्या न्यूयॉर्कला बसला.’न्यूयॉर्क’ आणि ‘न्यू जर्सी’ शहरांत आणिबाणी जायाला औद्योगिकरण शहरीकरण व अर्थव्यवस्था कारण आहे. दशलक्षांच्या संख्येत मोटारी वाहून जात असताना पाहून माणसे उसासा सोडतात. परंतु त्यांना हे माहीत नाही की या मोटारीच राक्षसी आपत्तींच्या जन्मदात्या आहेत.हीर केली गेली.

नद्यांचे रूप घेतलेले रस्ते बघुन, रस्त्यांची दैना झाली म्हणून हळहळणाऱ्या नागरिकांना याची जाणीव नाही की, या रस्त्यांच्या बांधणीतील सीमेंटच त्यांना बुडवत आहे. दुर्घटनांमुळे वीजपुरवठा खंडित झाला म्हणून कावणाऱ्या शहरवासीयांना भान नाही की, या वीजेमुळेच हे अस्मानी संकट कोसळले आहे.

कार्बन उत्सर्जनामुळे या अभूतपूर्व आपत्ती ओढवल्या आहेत. वरील तीनही गोष्टी ९५% कार्बन उत्सर्जनाला जबाबदार आहेत. मानवजात व जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मोटार, वीज आणि सीमेंटमधे कौतुक करण्यासारखे काही नाही. आधुनिक माणुस आपल्या कर्माची फळे भोगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *