आर्थिक स्थेर्यासाठी तसेच शेतकरी विकास साधण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करणे आवश्यक असल्याचे शासकीय, प्रशासकीय व सामाजिक स्थरावर नित्य सांगितले जाते. मात्र, तालुक्यात कुक्कुटपालन मत्स्यपालन, शेळी- मेंढीपालन, रेशीम शेती संकरित गाई- म्हशी पालन इत्यादी शेतीपूरक व्यवसाय केवळ योजने पुरतेच उरले असून, त्यांना वृद्धिगत करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
नैसर्गिक संकटामुळे तालुक्यात शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाला असून, सातत्याने आर्थिक नुकसान सोसणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकरी आत्महत्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. या समस्येवर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी केवळ पीक उत्पादनावर अवलंबून न राहता संकरित गाई- म्हशी पालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळी- मेंढी पालन, मधुमक्षिका पालन, रेशीम शेती, शेतमाल प्रक्रिया उद्योग इत्यादी शेतीपूरक व्यवसाय करावे आर्थिक स्थैर्यासाठी इतरांनी सुद्धा हे व्यवसाय उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून करावे, असा सल्ला शासनाकडून तज्ज्ञांकडून दिला जातो.

व्यवसाय विकसीत नाही
शेतकऱ्यांचा, नागरीकांचा पर्यायाने राज्याचा देशाचा विकास साधण्यासाठी शेती पुरक व्यवसाय करण्यासाठी विविध योजना राज्य सरकार तसेच केंद्र सरकार राबवित आहेत. परंतु तालुक्यात मोजकेच लोक या योजनांचा प्रत्यक्ष व्यवसाय करून विकास साधण्यासाठी लाभ घेत आहेत. तर बहुतांश लोक एवढे योजनेतून अनुदान मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शेतीपूरक व्यवसाय करतात. त्यामुळे अजूनपर्यंत तालुक्यात शेतमाल प्रक्रिया उद्योग संकरित गाई- म्हशी पालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य पालन,शेळी -मेंढी पालन ,मधुमक्षिका पालन ,रेशीम शेती, वराहपालन, शहामृग पालन ,इत्यादी शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झाले नाहीत.

यामुळे तालुक्यात पूरक व्यवसाय पिछाडीवर

 • शासन / प्रशासन स्तरावर नियोजनाचा पाठ पुराव्यांचा अभाव
 • अनुदान मिळविण्यापुरता नागरिकांचा योजनेतील सहभाग
 • प्रशासनाचे दुर्लक्ष, उदासीनता
 • योजनेअंतर्गत भ्रष्टाचार ,योजनांचा प्रचार – प्रसार करण्यास टाळाटाळ
 • पूरक व्यवसायांच्या माहितीचा अभाव
 • मार्गदर्शन, बाजारपेठेचा अभाव
 • सार्वजनिक स्तरावर व्यवसाय वृद्धीसाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्नांचा अभाव

पाणी विजेचा अभाव ठरतेय मुख्य अडचण
कोणती शेती पूरक व्यवसाय करायचा झाल्यास त्यासाठी सर्वाधिक गरज राहते पाणी आणि विजेची.परंतु, शेतात नित्य पाणी व वीज उपलब्ध राहत नसल्याने तालुक्यात शेती पूरक व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे

हे आवश्यक

 • शासन /प्रशासन स्तरावरून योग्य मार्गदर्शन
 • योजना राबविण्याचे योग्य नियोजन ,पाठपुरवा
 • योजनेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी बंदोबस्त
 • नागरीकांचा व्यवसाय करण्यासाठी उत्साह
 • आर्थिक नियोजनातून व्यवसाय
 • बाजारपेठेची उपलब्धता किंवा उत्पादन खरेदीची शासनस्तरावरून शाशवती
 • उद्योग केंद्र ,बँकांकडून योग्य मार्गदर्शन, सहकार्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *